…आता ‘या’ कारणासाठी सुद्धा टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील, राहुल गांधीचं टीकास्त्र

लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. याविरोधात लढण्यासाठी आता पंतप्रधान टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील.

    म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला मोदी सरकारचं कुशासन जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आता या आजाराशी लढण्यासाठी ते टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

    राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे फक्त भारतामध्येच कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसची नवी महामारी उद्याला आली आहे.

    लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. याविरोधात लढण्यासाठी आता पंतप्रधान टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील.