#RafaleScam – राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे ‘या’ शब्दांमध्ये साधला निशाणा,काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता

राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची (Rafale Scam) आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी(Inquiry Of Rafale Scam) होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi Criticized Prime Minister Narendra Modi) यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

  भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची (Rafale Scam) आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी(Inquiry Of Rafale Scam) होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

  आपल्या ट्विटर अकाउंटवरून राहुल गांधी यांनी “चोर की दाढी…” एवढे तीन शब्दच ट्विट केले आहेत. याशिवाय, या ट्विटमध्ये राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील राहुल गांधींनी दिला आहे. त्यामुळे या ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधल्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

  फ्रान्समधील Mediapart या शोध पत्रकारिता संकेतस्थळाने राफेल कराराची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती केल्याचं वृत्त दिलं आहे. ही चौकशी ‘संवेदनशील’ म्हटली गेली असून या ५९ हजार कोटींच्या करारामध्ये झालेल्या सर्व घडामोडींची चौकशी करण्यात येणार आहे. फ्रेंच पब्लिक प्रॉसिक्युशन सर्विसेसच्या आर्थिक गुन्हे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार गेल्या महिन्यात १४ जून रोजी हा तपास पुन्हा सुरू करण्यात आला. त्या आधारावर आता ही चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचं वृत्त मीडियापार्ट संकेतस्थळाने दिलं आहे.

  दरम्यान, दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये पीएनएफच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी या कराराला क्लीनचिट दिली होती. मात्र, आता त्याच अधिकाऱ्याचा कनिष्ठ अधिकारी पीएनएफचा प्रमुख झाला असून त्याने ही चौकशी सुरू करण्याच मंजुरी दिली आहे.

  दरम्यान, काँग्रेसनं मीडिया पार्टच्या याच वृत्ताचा हवाला देऊन भाजपावर निशाणा साधला आहे. “फ्रान्समधील संकेतस्थळ Mediapart नं रिलायन्स आणि डसॉल्ट करारामधील सर्व पुरावे उघड केले आहेत. मोदी सरकार आणि त्यांचा प्रिय असा राफेल करार आता उघडा पडला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदीय समितीच्या चौकशीला परवानगी देतील का?” असा सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.