Rahul Gandhi Video

काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi demand to modi government) यांनी नागरिकांना मोफत लस दिली गेली पाहिजे, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.

    केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा (vaccination) तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र अनेक ठिकाणी आता लसींचा तुटवडा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi demand to modi government) यांनी नागरिकांना मोफत लस दिली गेली पाहिजे, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं दिसत आहे.

    राहुल गांधी यांनी ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बचं उदाहरण देत कोरोना लस मोफत देण्याबाबत म्हटलं आहे. “भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे. सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की यावेळी त्यांना ती मिळेल.” असं राहुल गांधी यांनी ट्विट करत, सोबत #vaccine असं देखील जोडलं आहे.

    तसेच “चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका”, अशी टीका या अगोदर राहुल गांधी यांनी केलेली आहे.

    दरम्यान, राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. मात्र, लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र दिनापासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले.