झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार, राहुल गांधींनी केला पुन्हा एकदा प्रहार

शेतकऱ्यांचं (Farmers Income) उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार (Government) आहे, असा घणाघात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार, असं म्हणत राहुल गांधींनी प्रहार केला आहे.

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी उत्पन्न दुप्पट केलं हे खरं आहे. पण शेतकऱ्यांचं नव्हे, तर अदानी आणि अंबानी यांचं उत्पन्न दुप्पट केलं, अशी टीका राहुल यांनी केली होती. यासोबतच जे लोक हे काळे कृषी कायदे कसे योग्य आहेत अशीच दवंडी पिटत आहेत. ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय तोडगा काढणार?, असं म्हणत राहुल यांनी सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावावर टीका केली होती.