भाजपला ‘खयाली पुलाव’ म्हणत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

२१ दिवसांमध्ये कोरोनावर मात करु, आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे संरक्षण होईल, २० लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी यादी राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच ही यादी शेअर करत राहुल गांधी पुढे म्हणाले की, एक सत्य होतं की संकटातील संधी असा सवालही त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे  (Corona Virus) विरोधकांनी सतत केंद्र सरकारवर (Criticize on central government) टीका केली आहे. कोरोना कालावधीमधील भाजपला ‘खयाली पुलाव’ असे म्हणत काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी एक यादीच सादर केली आहे.

राहुल गांधींचा ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा :

२१ दिवसांमध्ये कोरोनावर मात करु, आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे संरक्षण होईल, २० लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी यादी राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच ही यादी शेअर करत राहुल गांधी पुढे म्हणाले की, एक सत्य होतं की संकटातील संधी असा सवालही त्यांनी केला आहे.

याआधीही ‘सब चंगा सी’ म्हणत केंद्र सरकारवर निशाणा :

कोविड विरुद्ध मोदी सरकारच्या ‘पूर्ण-लढाई’ ने भारताला संकटाच्या खाईत ढकलले आहे.” जीडीपीमध्ये २४ टक्के ऐतिहासिक घट झाली आहे, १२ कोटी रोजगार गमावले गेले आहेत, १५.५ लाख कोटी अतिरिक्त कर्ज गेले आहेत आणि जगातील कोविड आणि मृत्यूची सर्वाधिक प्रकरणे भारतात घडत आहेत. असे ट्विट कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.