संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय… राहुल गांधी यांचा सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.

    देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.

    आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे. मात्र, समाजातल्या काही घटकांना न्याय (NYAY) योजनेचा लाभ घेता यायला हवा. भारत सरकारची निष्क्रियता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.

    राहुल गांधी यांनी आत्तापर्यंत लॉकडाऊनचा विरोधच केला आहे. गेल्या वर्षी जेव्हा सरकारने लॉकडाऊन लागू केला होता त्यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. राहुल यांनी या आधी बऱ्याचदा सांगितलं होतं की लॉकडाऊनमुळे फक्त कोरोना प्रसाराचा वेग कमी होतो, त्यामुळे करोनाचा नायनाट होणार नाही. मात्र, आता राहुल यांनी स्वतःहून लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे.