राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी मर्यादा पुरुषोत्तम रामाला सर्वोत्तम मानवी गुणांचे स्वरुप म्हटले आहे. राम प्रेम आहे ते कधी द्वेषातून व्यक्त होऊ शकत नाही. राम करुणा आहे,क्रुरतेतून प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे , अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत हेही उपस्थित होते. हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी श्रीरामांच्या गुणांचे वर्णन केले आहे.