covid care coaches

रेल्वे मंत्रालयाने (railway ministry arranged 4 thousand covid care coaches) ६४ हजार बेडसह जवळपास ४ हजार कोविड केअर कोच राज्यांना वापरासाठी तयार केले आहेत. यापैकी १६९ कोच विविध राज्यांकडे सोपवण्यात आले असल्याचे समजते.

  भारतात सध्या कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, रेमडेसिवीर व लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून भारत सरकारच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

  रेल्वे मंत्रालयाने (railway ministry arranged 4 thousand covid care coaches) ६४ हजार बेडसह जवळपास ४ हजार कोविड केअर कोच राज्यांना वापरासाठी तयार केले आहेत. यापैकी १६९ कोच विविध राज्यांकडे सोपवण्यात आले असल्याचे समजते.

  राज्यांच्या मागणीनुसार रेल्वेने नागपूर, भोपाळ, इंदौर जवळील तिहीसाठी कोविड केअर कोच तयार केले आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर आणि नागपूर महापालिका आयुक्त यांच्यात ११ कोविड केअर कोचसाठी सामंजस्य करार झाला आहे,असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.


  सद्यस्थितीस रेल्वे विभागाकडे १६ झोनमध्ये ४ हजार २ डब्बे कोरोना रुग्णांसाठी सज्ज आहेत. राज्य सरकारने कोविड केअर कोचची मागणी केली, तर ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

  कोविड केअर कोचमध्ये रेल्वेकडून रूग्णांच्या सुविधेसाठी अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कुलर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचा यामध्ये समावेश आहे.
  पश्चिम रेल्वेकडे ३८६ आयसोलेशन कोच उपलब्ध असून, त्यापैकी १२८ कोच हे मुंबई विभागात आहेत. एखाद्या राज्याने या आयसोलेशन कोचची मागणी नोंदवल्यास, हे कोच त्यांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यास तयार असतील, असेही समजते.