राजस्थान हादरलं : चालत्या गाडीत पाच जणांनी केला विवाहितेवर सामूहिक बलात्कार

    राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील थानागाजीमध्ये एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. थानागाजी परिसरात 7 ऑगस्टच्या रात्री बोलेरोमध्ये आलेल्या पाच जणांनी 28 वर्षीय महिलेचे अपहरण केले. तीला बोलेरो कारने प्रतापगड रोडच्या दिशेने नेले. वाटेत या लोकांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

    पीडितेने सोमवारी थानागाजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गँगरेपचे पाचही आरोपी फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. पीडित महिला 4 मुलांची आई असून तिचा पती मजूरी करतो.

    पोलिस अधिकारी राजेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना आधिपासून ओळखतात.  परिसरातील एक महिला 7 ऑगस्ट रोजी रात्री 11 च्या सुमारास घराबाहेरपडली  तेव्हा बोलेरो कार आली आणि तिथे थांबली. गाडीत 5-6 लोक होते. आरोपींनी तिचे अपहरण केले आणि तिला प्रतापगड रोडच्या दिशेने नेले. वाटेत आरोपी श्यामा आणि त्याची मुले नैना, रामकिशन, राधा किशन आणि नैनाचा मुलगा काळू राम, रा. मचाडी पोलीस स्टेशन राजगढ, यांनी तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला.

    आरोपीने पीडित महिलेला धमकी दिली की, जर तीने या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर तो तीला ठार मारेल. या प्रकरणी 5 आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.