rajnath singh

भारतीय हवाई दलाच्या गुरुवारी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ)चे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

  केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) आणि नितीन गडकरी(Nitin Gadkari) गुरुवारी राजस्थानच्या(Rajasthan) बाडमेरच्या(Badmer) गंधव-बखसर विभागात राष्ट्रीय महामार्ग -९२५ वरील इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ) चे(Inauguration Of Emergency Landing Field) उद्घाटन केले आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानात दोन्ही मंत्री गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर कृत्रिम आपत्कालीन लँडिंग केले. एनएच ९२५ हा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे ज्याचा वापर हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी करण्यात येणार आहे.

  भारतीय हवाई दलाच्या गुरुवारी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ)चे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हवाई दलाच्या हरक्यूलिस सी -१३० जे विमानाने राष्ट्रीय महामार्गावर ‘मॉक इमर्जन्सी लँडिंग’ केले. या दरम्यान, दोन्ही मंत्री आणि संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत विमानात होते.

  हे सुद्धा वाचा

  यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “सध्या बाडमेर प्रमाणेच देशभरात एकूण २० आपत्कालीन लँडिंग पट्ट्या तयार केल्या जात आहेत. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या मदतीने अनेक हेलिपॅड देखील तयार केले जात आहेत. आमच्या सुरक्षासंदर्भातील पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. संरक्षणावर जास्त खर्च केला तर देशाच्या विकासावर परिणाम होईल, असं वाटत होतं. पण आज, राष्ट्रीय महामार्गावर इमरजेन्सी लँडिंग धावपट्टी पाहून संरक्षण आणि विकास सोबत होऊ शकतात, असं मी म्हणू शकतो.

  तसेच “आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अशी धावपट्टी बनवून आम्ही एक संदेश दिला आहे की आम्ही कोणत्याही किंमतीत आपल्या देशाच्या एकता, विविधता आणि सार्वभौमत्वासाठी उभे राहू,” असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी एनएच-९२५ए च्या सट्टा-गंधव विभागाच्या तीन किलोमीटरच्या भागावर ही धावपट्टी तयार केली आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ आणि वाहतूक विमानांनी लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर मॉक लँडिंग करत अशा महामार्गांचा वापर भारतीय हवाई दलाच्या विमानाद्वारे आपत्कालीन लँडिंगसाठी केला जाऊ शकतो हे दाखवून दिले होते. तसेच यापुढे देशातील सर्व महामार्ग हे गरज पडल्यास भारतीय वायू दलाला वापरता येतील अशा क्षमतेचे आणि आकाराचे असावेत, असे आदेश गडकरी यांनी दिले होते.