‘उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत हिंदू नेत्याला मारण्याचा भाजप रचणार कट’, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचं खळबळजनक विधान

“आपला देश सरकारी तालिबानन्यांनी ताब्यात घेतला आहे”, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. भाजपा हा ‘सर्वात धोकादायक पक्ष’ (Bjp Is Dangourous Party)असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सिरसा येथे किसान महापंचायतीला संबोधित करताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) आणि भाजपवर(BJP) निशाणा साधला आहे.

    शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait)यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “आपला देश सरकारी तालिबानन्यांनी ताब्यात घेतला आहे”, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. भाजपा हा ‘सर्वात धोकादायक पक्ष’ (Bjp Is Dangourous Party)असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सिरसा येथे किसान महापंचायतीला संबोधित करताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) आणि भाजपवर(BJP) निशाणा साधला आहे.

    राकेश टिकैत म्हणाले की, “जेव्हा उत्तर प्रदेशात निवडणुका होतील तेव्हा ते निवडणुक जिंकण्यासाठी मोठ्या हिंदू नेत्याला मारण्याचा कट रचतील. हिंदू-मुस्लिम संघर्ष पेटवतील. त्यांना हिंदू-मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करून, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील हिंदू नेत्यांना मारून निवडणुका जिंकायच्या आहेत. भाजप हा आजपर्यंतचा सर्वात धोकादायक पक्ष आहे. हा पक्ष ज्या लोकांनी उभा केला त्या खऱ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

    ते पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांचं डोकं फोडण्याची सूचना देणारे कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आयुष सिन्हा यांचा भाजपाची शाखा मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंध होता. कर्नाल एसडीएम (आयुष सिन्हा) आरएसएसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा भाचा आहे. हाच अधिकारी या ‘सरकारी तालिबान’चा पहिला कमांडर आहे. राकेश टिकैत यांनी यावेळी कर्नालमधील शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे सांगितले.