अयोध्या राम मंदिर पायाभरणी ‘इफेक्ट’, ४ पटीने वाढल्या भूखंडाच्या किंमती

अयोध्येत राममंदिर उभारणी सुरु होताच पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानेच मोठमोठे उद्योगपतीही आता अयोध्येत व्यवसाय वाढविण्यासाठी भूखंडांचा शोघ घेत आहेत. यात हॉटेल आणि धर्मशाळा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

अयोध्या : उत्तरप्रदेशातील अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर येथील भूखंडाच्या (Land prices) किमतीवरही त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राममंदिराची पायाभरणी (Foundation stone of Ram temple)केली तेव्हापासूनच अयोध्येतील भूखंडांचे दर आकाशाला गवसणी घालू लागले आहेत. (increase in land prices) यापूर्वी येथे यार्डप्रमाणे जमिनीची विक्री होत होती. आता वर्गफुटा प्रमाणे विक्री होऊ लागली आहे. जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित एका व्यक्तीने सद्यस्थितीत भूखंडांची मागणी वाढली असल्याची माहिती दिली. अधिकांश जण आता अयोध्येत हॉटेल, रेस्टॉरंट्स, धर्मशाळेसाठी भूखंडाचा शोध घेत असल्याचेही हा व्यक्ती म्हणाला.

हॉटेल, धर्मशाळांना प्राधान्य

अयोध्येत राममंदिर उभारणी सुरु होताच पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यानेच मोठमोठे उद्योगपतीही आता अयोध्येत व्यवसाय वाढविण्यासाठी भूखंडांचा शोघ घेत आहेत. यात हॉटेल आणि धर्मशाळा सुरु करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

काही उद्योगपती तर व्यवसायातील नव्या संधीचा शोध घेण्यासाठीही अयोध्येकडे कूच करीत असल्याचे समजते. देशच नव्हे तर जगातूनही अनेक जण अयोध्येत येत आहेत. काही जण धार्मिक सेवेसाठी तर काही समाजसेवेसाठी अयोध्येत धर्मशाळा, कथा मंडप उभारण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच अयोध्येतील भूखंडांच दर वाढणे स्वाभाविक आहे असे ते म्हणाले.