रामाच्या चरणी कम्युनिष्ट, उजवे आणि RSS ला आव्हान देण्याची तयारी

सीपीआय मलप्पुरमच्या जिल्हा समितीने आपल्या फेसबुक पेजवर सात दिवसांचे ऑनलाइन चर्चासत्र सुरू केलं आहे. यामध्ये पक्षाचे राज्यस्तरीय नेतेही रामायण आणि रामावर बोलत आहेत. ‘रामायण आणि भारतीय परंपरा’ हा या चर्चासत्राता विषय आहे. २५ जुलैपासून सुरू झालेल्या चर्चेचा आज समारोप झाला.

    सध्या देशाचं राजकारण रामाच्या भोवती फिरतावना दिसतं. सर्वच पक्ष रामाच्या नावाने जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) रामायणाकडे वळली आहे. केरळमध्ये (Kerala) पक्षाच्या मलप्पुरम जिल्हा समितीने रामायणावर ऑनलाइन चर्चा सत्र सुरू केलं आहे. राजकीय युद्धात हे एक नवीन शस्त्र मानले जात आहे.

    सीपीआय मलप्पुरमच्या जिल्हा समितीने आपल्या फेसबुक पेजवर सात दिवसांचे ऑनलाइन चर्चासत्र सुरू केलं आहे. यामध्ये पक्षाचे राज्यस्तरीय नेतेही रामायण आणि रामावर बोलत आहेत. ‘रामायण आणि भारतीय परंपरा’ हा या चर्चासत्राता विषय आहे. २५ जुलैपासून सुरू झालेल्या चर्चेचा आज समारोप झाला.

    सीपीआय मलप्पुरमचे जिल्हा सचिव पी के कृष्णदास म्हणाले की, “सध्या जातीय आणि फॅसिस्ट शक्ती हिंदुत्वाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर दावा करतात. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात समाज आणि इतर राजकीय पक्ष त्यापासून दूर जात आहेत. रामायणा सारखी महाकाव्ये आपल्या देशाच्या सामान्य परंपरा आणि संस्कृतीचा भाग आहेत. टॉक शोच्या माध्यमातून पक्षाने पुरोगामी युगात रामायण कसे वाचावे आणि समजून घ्यावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.”

    सध्याच्या रामाच्या राजकारणावर बोलताना सीपीआयचे केशवन नायर म्हणाले की, “रामायण काळातील राजकारण हे संघाच्या राजकारणापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. विरोधाभासी शक्तींचे वाहक म्हणून भगवान रामाचे चित्रण केले आहे. कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत ही रामायणाच्या सखोल अभ्यासानंतर कम्युनिस्टांच्या मनात येणारी पहिली गोष्ट आहे.”