sonia and rahul gandhi

इतिहासकार रामचंद्र गुहा(ramchandra guha) यांनी आपल्या एका लेखामध्ये गांधी कुटुंबाला सल्ला दिला आहे. गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी(gandhi family should leave the congress), असे परखड मत गुहा यांनी व्यक्त केले आहे.

दिल्ली: प्रख्यात लेखक आणि क्रिकेट ते समाजकारण यावरील भाष्यकार तसेच इतिहासकार रामचंद्र गुहा(ramchandra guha) यांनी आपल्या एका लेखामध्ये गांधी कुटुंबाला सल्ला दिला आहे. गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी(gandhi family should leave the congress), असे परखड मत गुहा यांनी व्यक्त केले आहे. गुहा यांनी आपल्या लेखामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही, असेही म्हटले आहे. त्याचबरोबर गुहा यांनी आपल्या या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचाही उल्लेख केला आहे.

मोदी, शाह, नड्डा सेल्फमेड नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेले नाही, ते सेल्फमेड नेते आहेत. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत, कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे, असे रोखठोक मत गुहा यांनी आपल्या लेखात मांडले आहे. गांधींनी आता जाणे गरजेचे का आहे, या मथळ्याखाली गुहा यांनी हा लेख लिहिला आहे.

प्रचाराच्या काळात राहुल सुट्टीवर

गुहा यांनी आपल्या या लेखामध्ये राहुल गांधी हे राजकारणासंदर्भात किती गंभीर आहेत, हे सांगण्यासाठी बिहार निवडणुकीचे उदाहरण दिले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये राहुल गांधी सुट्यांसाठी निघून गेले होते. यावर बिहारमधील काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने टीकाही केली होती, अशी आठ‌ण गुहा यांनी करून दिली आहे. याच बाबतीत गुहा यांनी पुढे भाजपाचे कौतुक केले आहे. गुहा लिहितात, काँग्रेसच्या उलट जात, भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अध्यक्ष असणारे जे. पी. नड्डा यांनी अशा ठिकाणी दौरा करण्याची घोषणा केली, जिथे पक्षाने वाईट कामगिरी केली आहे.

मी महात्मा गांधींच्या काँग्रेसचा समर्थक
याच लेखात पुढे गुहा यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक असल्याचेही निरिक्षण नोंदवले आहे. काँग्रेसचे जेवढे टीकाकार आहेत त्याहून अधिक भाजपाचे आहेत, असे सांगताना गुहा यांनी मोदी सरकारच्या धोरणांचे विश्लेषण करत त्यावरून भाजाच्या विचारसणीवर टीका केली आहे. मात्र पुढे लिहिताना गुहा यांनी, मी ज्या काँग्रेसचा समर्थक होतो ती महात्मा गांधीची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवू देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र आज काँग्रेस स्वत:ला स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबताना दिसत आहे, असा टोला काँग्रेसला लगावला आहे.

हे आहेत तीन मोठे फरक

काँग्रेस एकीकडे आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तस दुसऱ्या दिवशी ते उद्योजकांना विरोध करताना दिसतात, असे गुहा म्हणाले आहेत. काँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये तीन मुद्यांवरून खूप मोठा फरक लक्षात येतो, असे गुहा यांनी लेखात म्हटले आहे. भाजपाचे नेतृत्व हे सेल्फ मेड म्हणजेच स्वत: घडवलेले नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आलेले नाहीत, असे गुहा यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे.