रामदेव बाबांच्या रुची सोयामुळे झाले कंगाल; गेल्या ५५ दिवसांपासून गुंतवणूकदार आले गोत्यात

शेअरधारकांचे गेल्या दोन महिन्यांत १७ टक्के नुकसान झाले आहे. हे शेअर १७ टक्क्यांनी घसरले आहेत. धक्कादायक म्हणजे रामदेव बाबांनी काही दिवसांपूर्वीच रुची सोया आणि पतंजलीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. रुची सोयाचा एनएफओ आणण्यात येणार आहे. यामुळे प्रमोटर्सची शेअरिंग कंपनीपेक्षा कमी होईल आणि कंपनीला आपल्या कर्जातून मुक्ती मिळेल.

    नवी दिल्ली : रामदेव बाबा (Ramdev baba) आपल्या ग्रुपच्या आणि त्याच्या कंपन्यांबाबत मोठमोठे दावे करत असले, तरीदेखील रुची सोयाच्या (Ruchi Soya) शेअरनी गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. गेल्या ५५ दिवसांपासून रुची सोयाचे शेअर कमालीचे घसरले असून ज्याच्याकडे १००० शेअर होते तो तब्बल २.१७ लाखांहून अधिक रुपयांना धुपला आहे.

    शेअरधारकांचे गेल्या दोन महिन्यांत १७ टक्के नुकसान झाले आहे. हे शेअर १७ टक्क्यांनी घसरले आहेत. धक्कादायक म्हणजे रामदेव बाबांनी काही दिवसांपूर्वीच रुची सोया आणि पतंजलीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. रुची सोयाचा एनएफओ आणण्यात येणार आहे. यामुळे प्रमोटर्सची शेअरिंग कंपनीपेक्षा कमी होईल आणि कंपनीला आपल्या कर्जातून मुक्ती मिळेल. दुसरीकडे पतंजलीचा आयपीओ आणण्याचीही तयारी केली जात आहे. चला जाणून घेऊया गुंतवणूकदारांना कितीचे नुकसान झाले आहे.

    ५५ दिवसांत रुची सोयाचा शेअर १७ टक्क्यांनी घसरला आहे. गेले दोन महिने रुची सोयासाठी काही खास नव्हते. आकडेवारीनुसार ९ जून २०२१ ला कंपनीच्या शेअरची किंमत १३१७ रुपये होती. यानंतर कंपनीचे शेअर धडाधड कोसळू लागले. आज कंपनीचा शेअर ११०१.८० रुपयांवर आला आहे. या काळात कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.

    १००० शेअर घेतलेल्यांना २.१७ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. शेअरची किंमत घसरली तर काही गुंतवणूकदारांना फायदा, तर काहींना तोटा होतो. १३१७ रुपयांनुसार १००० शेअरची किंमत १३,१७,००० झाली होती. आता हीच किंमत ११,०१,८०० रुपयांवर आली आहे.

    ramdev babas ruchi soya stock slips 55 days investors lost