baba ramdev

रामदेवबाबांचा एक व्हिडिओ(Ramdev Baba  Viral Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

    कोरोना काळात योगगुरू रामदेवबाबा(Ramdev Baba) यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधाने न करण्याचा सल्ला दिला होता. आयएमएने पतंजली संस्थापक रामदेवबाबा यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे.  रामदेवबाबा यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या जात आहेत. दरम्यान, रामदेवबाबांचा एक व्हिडिओ(Ramdev Baba  Viral Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    या व्हिडिओवरूनदेखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेबाबत म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.”

    हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांना लक्ष्य केले आहे.

    रामदेवबाबा  म्हणाले, लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोकं जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो. रामदेवबाबा यांच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी केंद्र सरकारलाही ट्रोल केले आहे. स्वामी रामदेव हे भाजप आणि पंतप्रधान यांच्या जवळचे असल्यामुळे, असे वक्तव्य करीत आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.