शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा रिक्त , केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती

लोकसभेत आरक्षित पदांच्याबाबत काँग्रेस खासदार एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला रमेश पोखरियाल यांनी उत्तर देत ही माहिती लोकसभेत दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीमधील संबद्ध स्वामी श्रद्धानंद कॉलेजच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी सहायक प्राध्यापकाच्या मुलाखती घेतल्या गेल्या.

    नवी दिल्ली: केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षित पदांविषयी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी लोकसभेत मह्त्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच एससी आणि एसटी प्रवर्गासाठी ४० टक्के जागा रिक्त आहेत. परंतु आयआयएमसारख्या संस्थेमध्ये एकूण आरक्षणाच्या ६० टक्के पद रिक्त असल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली आहे.

    लोकसभेत आरक्षित पदांच्याबाबत काँग्रेस खासदार एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला रमेश पोखरियाल यांनी उत्तर देत ही माहिती लोकसभेत दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीमधील संबद्ध स्वामी श्रद्धानंद कॉलेजच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी सहायक प्राध्यापकाच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यावेळी एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी नॉट फाऊंड सुटेबल असा शेरा मारण्यात आला होता. त्या शिक्षकांनी प्रकरणाची उच्चस्थरिय चौकशी करण्याची मागणी केली होती.

    डीटीएच्या माहितीनुसार त्या आरक्षित जागांसाठी योग्य आणि पात्र उमेदवार उपलब्ध होते. मात्र, जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात आलं आहे. नॉट फाऊंड सुटेबल असा शेरा २ ओबीसी, २ एससी आणि १ एसटी प्रवर्गातील पदांवर देण्यात आला होता. तर, कॉम्प्युटर सायन्समधील ओबीसी पद रद्द करण्यात आले आणि जीवशास्त्र विभागात ओबीसीसाठी राखीव असलेल्या पदांची मुलाखत रद्द करण्यात आली होती.