प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस ; ट्विट करत म्हणाले…

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस घेतली आहे. तसेच लस घेतल्यानंतर त्यांनी ट्विट करत प्रत्येक व्यक्तीला लवकरच कोरोना लस मिळून तो सुरक्षित होईल, असे मला खरच वाटते, अशा प्रकारचं ट्विट रतन टाटा यांनी केलं आहे.

    नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी १ मार्चपासून कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस घेतली आहे. तसेच लस घेतल्यानंतर त्यांनी ट्विट करत प्रत्येक व्यक्तीला लवकरच कोरोना लस मिळून तो सुरक्षित होईल, असे मला खरच वाटते, अशा प्रकारचं ट्विट रतन टाटा यांनी केलं आहे.

    ट्विट करत काय म्हणाले रतन टाटा?

    रतन टाटा यांनी कोरोना लस घेतल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. शनिवारी सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये रतन टाटा म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. त्याबाबत मी आभारी आहे. हे खूपच सोपे आहे आणि याचा बिलकूल त्रास झाला नाही. प्रत्येक व्यक्तीला लवकरच कोरोना लस मिळून तो सुरक्षित होईल, असे मला खरच वाटते, असा विश्वास रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केला.

    संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम कोरोनाची लस घेतली. यानंतर अनेक नेते, मंत्री, दिग्गजांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. यातच जागतिक पातळीवर प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाची लस घेतली आहे.