चिंता वाढवणारी बातमी, १ ऑक्टोबरपासून सीएनजी आणि पीएनजी महागण्याची शक्यता

ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दरात(Cylinder Rate) आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी आणि पाईप गॅसची (पीएनजी) किंमत(Increase Of CNG And PNG Rate) १० ते ११ टक्क्यांनी वाढू शकते. एका अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात गॅसची किंमत ७६ टक्क्यांनी वाढू शकते.

    मुंबई: महागाई आणि इंधनाच्या वाढत्या(Fuel Price Hike) दरामुळे सध्या सामान्य नागरिकाचे हाल होत आहेत. त्यातच आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दरात(Cylinder Rate) आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली(Delhi) आणि मुंबईमध्ये(Mumbai) सीएनजी आणि पाईप गॅसची (पीएनजी) किंमत(Increase Of CNG And PNG Rate) १० ते ११ टक्क्यांनी वाढू शकते. एका अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात गॅसची किंमत ७६ टक्क्यांनी वाढू शकते.

    देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता १ ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील. अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या १.७९ डॉलर्स आहे. १ ऑक्टोबरपासून एपीएमचा दर ३.१५ डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट इतका होईल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी ६ आणि बीपी पीएलसी खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून ७.४ एएमबीटीयू इतकी होईल. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती १० ते ११ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

    या दरवाढीमुळे एप्रिल २०२२ पर्यंत सीएनजी आणि पीएनजी आणखी महागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गॅसचे दर वाढल्यास ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला मोठा फायदा होईल.