स्वत:च्या सर्जरीसाठी जमा केलेले २ लाख रुपये उंदरानं कुरतडले; शेतकरी हवालदिल, पेच सोडवणार कोण?

नाईक हे आपल्या दुचाकीवरुन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय देखील करतात. आज त्यांनी पैसे ठेवलेली बॅग उघडून पाहिली असता त्यांना सर्व नोटा उंदरानं कुरतडून टाकल्याचं दिसून आलं आणि ते पुरते खचले.

  हैदराबादच्या महाबुबाबादमधील वेमुनूर नावाच्या एका छोट्याशा गावात एका शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. स्वत:च्या सर्जरीसाठी त्यानं मोठ्या कष्टानं जमा केलेल्या २ लाख रुपयांच्या नोटा उंदरानं कुरतडून नष्ट केल्या आहेत. कुरतडलेल्या नोटा पाहून शेतकरी मानसिकरित्या पूर्णपणे कोसळला आहे.

  भाजीपाल्याची शेती करणारे रेडिया नाईक यांनी आपल्या राहत्या घरातील कपाटात २ लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. यात सर्व पाचशेच्या नोटांचा समावेश होता. नाईक हे आपल्या दुचाकीवरुन भाजीपाला विकण्याचा व्यवसाय देखील करतात. आज त्यांनी पैसे ठेवलेली बॅग उघडून पाहिली असता त्यांना सर्व नोटा उंदरानं कुरतडून टाकल्याचं दिसून आलं आणि ते पुरते खचले.

  रेडिया नाईक यांनी मोठ्या कष्टानं ही कमाई केली होती. तर काही रक्कम त्यांनी आपल्या नातेवाईकांकडून उधार म्हणून घेतली होती. पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी नाईक यांनी ही रक्कम जमा केली होती. कुरतडलेल्या नोटा घेऊन ते बँकेत गेले असता बँकेनंही नोटा स्वीकारल्या नाहीत.

  रेडिया नाईक यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यासाठी एका रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. यासाठीच ते दोन लाखांची रक्कम जमा करत होते. महबुबाबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. यासाठी त्यांना चार लाखांचा खर्च सांगण्यात आला होता.

  बँकांना नोटा स्वीकारण्यास नकार देत आरबीआयकडे जाण्याचा सल्ला नाईक यांना दिला. त्यांनी हैदराबादमधील आरबीआय बँकेकडेही आपली व्यथा मांडली. पण नोटा अर्ध्यापेक्षाही अधिक कुरतडलेल्या असल्यामुळे नियमानुसार त्यांना कुरतडलेल्या नोटांऐवजी नव्या नोटा देत येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे.

  rats nibble rs 2 lakh cash in telangana vegetable farmer kept his surgery nrvb