rbi monetary policy rbi governor shaktikanta das press conference latest news

अत्यावश्यक आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Reserve Bank Governor Shaktikant Das)यांनी केली आहे.

  सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. ही परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी(shaktikant das)  रिझर्व्ह बँक कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ते सांगितले.

  पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक आहे, असं दास म्हणाले. अत्यावश्यक आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा दास यांनी केली आहे.

  शक्तिकांत दास म्हणाले, “पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत रिकव्हरी पाहायला मिळाली होती. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बँकांद्वारे २१ मार्च २०२२ पर्यंत रुग्णालये, ऑक्सिजन, लस आयात करणारे, कोरोनाची औषधे यांसाठी प्राथमिकतेच्या आधारावर ५० हजार कोटी रूपयांची मदत केली जाणार आहे.

  ते पुढे म्हणाले, केवायसीबाबत रिझर्व्ह बँकेनं मोठी सूट दिली. व्हिडीओ केवायसी आणि नॉन फेस टू फेस डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला चालना देण्यासही दास यांनी सांगितलं.

  कोरोना महासाथीच्या विरोधात व्यापक पावलं उचलण्याची गरज आहे. भारतानं कोरोनाविरोधातील आपली लढाई आक्रमकतेनं सुरू केली आहे. रिझर्व्ह बँक सध्या स्थितीवर नजर ठेवून आहे,असंही ते म्हणाले.

  एप्रिल महिन्याच्या मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये महागाईसाठी वर्तवण्यात आलेल्या शक्यतेवर बदलांची शक्यता नसल्याचंही दास यांनी स्पष्ट केलं.