आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. माझी प्रकृती सध्या ठिक असून गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, मला कोविड -19 ची लागण झाली आहे. मला कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. माझी तब्बेत आता ठिक आहे. माझ्या संपर्कातील लोकांनी काळजी घ्यावी. आयसोलेशनमध्ये राहुन मी काम करणार आहे. आरबीआयमधील काम सामान्य पद्धतीने सुरू राहील. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलिफोनद्वारे डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणार आहे”