अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शक्तिकांत दास यांचा मोठा निर्णय
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शक्तिकांत दास यांचा मोठा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्णपणे तयार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासाळली आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि पुन्हा रूळावर आणण्यासाठी आरबीआय (RBI) महत्त्वाचे पाऊल उचलणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी बुधवारी दिली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यास केंद्रीय बँक (Central  Bank) पूर्णतः तयार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्णपणे तयार आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की,’अर्थव्यवस्थेतील प्रगती अद्याप पूर्ण वेगावर पोहोचलेली नाही, ती हळूहळू प्रगती करेल.’

कमी कॅशच्या उपलब्धतेमुळे सरकारची उधारीची किंमत अत्यंत कमी राहिली आहे आणि सध्या बॉन्डचे उत्पन्न हे गेल्या दहा वर्षांच्या खालच्या पातळीवर आहे. तसेच जीडीपी डेटा अर्थव्यवस्थेतील कोविड -१९ चा (Covid-19) उद्रेक दर्शवितो. असे शक्तिकांत दास म्हणाले.