भारतात कोरोना रुग्णांची २४ तासांत विक्रमी वाढ ; ४ लाखांहून जास्त रुग्णसंख्या नोंदवणारा पहिला देश

कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये भारतानं विक्रमी वाढ नोंदवली असली, तरी दुसरीकडे दिवसभरात एकूण २ लाख ९९ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही बाब कोरोनाच्या दाहकतेसमोर देखील देशवासीयांसाठी दिलासादायक ठरली आहे.

    भारतात कोरोनाची रोजची आकडेवारी पाहाता कोरोनाचा विळखा देशाला अधिकाधिक घट्टपणे पडू लागल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. गेल्या २४ तासांत तर भारतात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. २४ तासांत ४ लाखांहून जास्त कोरोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. या आकडेवारीमुळे एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर आला आहे.

    त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ हजार ५२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.