सशस्त्र वैद्यकीय सेवेत 89 पदांवर भरती, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या सविस्तर

डायरेक्टर जनरल ऑफ आर्मड फोर्सेस मेडिकल सर्विसेस गट कच्या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं भरावा लागणार आहे. इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर यासंदर्भातील नोटिफिकेशन आणि जाहिरात उपलब्ध आहे. ती जाहिरात डाऊनलोड करुन इच्छूक उमेदवार प्रिंटआऊट काढून अर्ज भरुन पाठवून शकतात.

  नवी दिल्ली : डायरेक्टर जनरल ऑफ आर्मड फोर्सेस मेडिकल सर्विसेसमध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु होत आहे. गट क मधील 89 पदासांठी पात्र उमदेवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणारे पात्र उमेदवार डायरेक्टर जनरल ऑफ आर्मड फोर्सेस मेडिकल सर्विवेससाठी अर्ज इंडियन आर्मीच्या वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करुन तो 9 ऑगस्टपूर्वी सादर करु शकतात.

  अर्ज कसा करायचा?

  डायरेक्टर जनरल ऑफ आर्मड फोर्सेस मेडिकल सर्विसेस गट कच्या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं भरावा लागणार आहे. इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर यासंदर्भातील नोटिफिकेशन आणि जाहिरात उपलब्ध आहे. ती जाहिरात डाऊनलोड करुन इच्छूक उमेदवार प्रिंटआऊट काढून अर्ज भरुन पाठवून शकतात. आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे, मुंबई येथील आर्मड फोर्सेस मेडिकल स्टोर डेपोट, आकुर्डी, कांदिवली मुंबई, लखनऊ येथील पत्यावर पाठवावते. उमेदवारांनी अर्ज पाठवण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घेणं आवश्यक आहे.

  कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया?

  मल्टी टास्किंग स्टाफ, बार्बर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, स्टेनो, वॉशरमन, ट्रेडमन मेट, कँटीन बिअरर, लोअर डिव्हिजनल क्लार्क, फायरमन, एक्स रे इलेक्ट्रिशियन, कुक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार या पदासांठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी दहावी, बारावी आणि पदवी त्यासह संबंधित पदासाठीचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

  पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी दोन टप्प्यात परीक्षा घेतली जाईल. पहिल्यांदा लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाईल. ही परीक्षा 100 गुणांसाठी असेल. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ट्रेड टेस्ट घेतली जाईल. लेखी परीक्षेत सामान्यज्ञान, इंग्रजी, तार्किक क्षमता आणि गणितीय क्षमता यासंदर्पबातील प्रश्न विचारले जातील. ट्रेड टेस्ट साठी एकास पाच याप्रमाणं उमेदवारांना बोलावलं जाईल.