नोकरीची उत्तम संधी! एअर इंडियात रिक्त पदांवर भरती

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकातामध्ये पोस्टिंग मिळेल. पगारही आकर्षक असेल, असे सांगितले जात आहे.

    नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे ठप्प झालेले अनेक उद्योग, क्षेत्र हळूहळू सावरताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी आहे.

    एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकातामध्ये पोस्टिंग मिळेल. पगारही आकर्षक असेल, असे सांगितले जात आहे.

    अर्ज करण्यासाठी पात्रता

    सामान्य ग्रॅज्युएट (फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक) ते एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ते नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहे.