सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा, पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरात घट

पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol, diesel) दरामध्ये गेल्या महिनाभरात प्रतिलिटरमागे एक ते तीन रुपयांनी घट झाली असून, केरोसीनचे भाव पावणेतेरा रुपयांनी घटले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol, diesel) दरामध्ये गेल्या महिनाभरात प्रतिलिटरमागे एक ते तीन रुपयांनी घट झाली असून, केरोसीनचे भाव पावणेतेरा रुपयांनी घटले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे जगभरात टाळेबंदी लागू होती. मागणी घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलचे (Crude Oil) दर शून्य डॉलरपर्यंत खाली आले होते. या काळात घटलेल्या इंधन दराचा फायदा आता स्थानिक बाजारपेठेत दिसून येत आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (IOC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील डिझेलच्या किरकोळ विक्री किंमतीत सप्टेंबरमध्ये २.९३ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९७ पैशांनी घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातही डिझेलच्या किमती १७ पैशांनी घटल्या असून, पेट्रोलचे भाव मात्र स्थिर आहेत. घटत्या इंधन दराचा फायदा वाहनचालकांना मिळाला आहे.