रिबॉकच्या लिक्विफेक्ट १८० ची नवीकोरी आवृत्ती बाजारात दाखल

रिबॉक लिक्विफेक्ट १८० च्या अधिक चांगल्या कुशनिंगमुळे तुम्ही अगदी आरामत अंतर पार करू शकता. हे बूट जवळ असताना कुणाला नियमितपणे धावायला जाण्याचा कंटाळा येणे कठीण आहे. ग्राहकांच्या आजच्या काळातील गरजा पूर्ण करणाऱ्या उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आधार लाभलेले लिक्विफेक्ट १८० शूज हे भारतीयांनी धावण्याला आपली आवडती फिटनेस ॲक्टिव्हिटी बनवावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यास तयार आहेत.

  नवी दिल्ली : अग्रगण्य फिटनेस आणि लाइफस्टाइल ब्रँड रिबॉकने अप्रतिम कुशनिंग असणाऱ्या, दीर्घकाळ आराम देणाऱ्या व टाचांपासून पायांच्या बोटांपर्यंत संपूर्ण पावलाला बंदिस्त करून आधार देणाऱ्या परिपूर्ण अशा आपल्या लिक्विफेक्ट १८० शूजची स्प्रिंग समर आवृत्ती बाजारात दाखल केली आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या सर्व सकारात्मक प्रतिक्रियांची दखल घेत तयार करण्यात आलेल्या लिक्विफेक्ट १८० मध्ये अधिक चांगल्या सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि सर्वांच्या मनावर छाप पाडण्यासाठी ते सज्ज आहेत.

  रिबॉक लिक्विफेक्ट १८० च्या अधिक चांगल्या कुशनिंगमुळे तुम्ही अगदी आरामत अंतर पार करू शकता. हे बूट जवळ असताना कुणाला नियमितपणे धावायला जाण्याचा कंटाळा येणे कठीण आहे. ग्राहकांच्या आजच्या काळातील गरजा पूर्ण करणाऱ्या उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आधार लाभलेले लिक्विफेक्ट १८० शूज हे भारतीयांनी धावण्याला आपली आवडती फिटनेस ॲक्टिव्हिटी बनवावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यास तयार आहेत.

  गेल्या वर्षाने आपल्याला दैनंदिन फिटनेसच्या बाबतीत अधिक स्वावलंबी बनायला शिकवले. धावणे हा व्यायामप्रकार नेहमीच तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्याचा सर्वात प्रभावी व उत्साहवर्धक प्रकार आहे आणि नेहमीच राहील. धावणे अधिक सुलभ करण्यासाठी रिबॉकच्या लिक्विफेक्ट १८० ना पुढील काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे:

  • दीर्घकाळ टिकणारे कुशनिंग: लिक्विफेक्ट तंत्रज्ञानामुळे शूजचे कुशनिंग बराच काळ तसेच राहते
  • अधिक सहजतेने पाऊले टाकणे: यातील प्रत्येक पावलागणिक फ्युएलफ्रेम कुशनिंग आणि पावलाकडून मिळणारा प्रतिसाद यांच्यातील समतोल साधते.
  • अखंड आधार: ३डी फ्युएलफ्रेम आणि हील ओव्हरले पावलापासून ते पायाच्या बोटांपर्यंत संपूर्ण पावलाला बंदिस्त करून आधार देते.

  फिटनेसचा एक अत्यंत मनस्वी प्रकार म्हणून अनेक वर्षांपासून धावण्याचा छंद जोपासताना मला जाणवले की, योग्य बुटांच्या माध्यमातून पावलांना चांगला आधार मिळतो तेव्हाच धावण्याचा परिणाम चांगल्या प्रकारे साधता येतो. धावण्याचा समाधानकारक अनुभव मिळविण्यासाठी योग्य प्रमाणात कुशनिंग असणारे आणि ब्रीदेबल शूज आवश्यक आहेत. असे शूज जे स्थिरता देतील व टाचेला आधार देतील. केवळ कामगिरी सुधारण्यासाठी नव्हे तर योग्य फिट राखत पावलांना आराम देतील. रिबॉक लिक्विफेक्ट १८० मध्ये योग्य प्रमाणात कुशनिंग आहे आणि धावताना घसरायला होऊ नये यासाठी पुरेशी फूट स्पेस ठेवण्यात आलेले हे शूज दीर्घकाळासाठी धावण्याचा अनुभव देतात.

  अमित दहिया, मास्टर ट्रेनर, रिबॉक

  रिबॉक लिक्विफेक्ट १८० हे स्त्री व पुरुषांसाठी तसेच विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत आणि रिबॉकच्या निवडक स्टोअर्समध्ये, तसेच ऑनलाइन shop4reebok.com, फ्लिपकार्ट व ॲमेझॉन येथे विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांची रिटेल किंमत रु. ६,५९९/- इतकी आहे.