रीबॉक रेट्रो-फ्युचर झिग कायनेटिका टू करत आहे आयकनिक स्पोर्ट स्टाइल मॉडेलच्या न्यू जनरेशनची सुरुवात

२०२० च्या स्प्रिंगमध्ये बाजारात आलेल्या रीबॉकच्या झिग कायनेटिका फ्रँचायझीने ब्रॅण्डच्या ऐतिहासिक झिगटेक कामगिरी तंत्रज्ञानामध्ये नवीन युगाची सुरुवात केली. २०१० मध्‍ये प्रथम सर्वांसमोर आल्यापासून या श्रेणीने नवोन्मेष, शैली आणि कार्यात्मकतेच्या सर्व सीमा विस्तारल्या आहेत.

  नवी दिल्ली : रीबॉकने आपल्या रेट्रो-फ्युचर झिग कायनेटिकाच्या नेक्स्ट जनरेशनचे अनावरण झिग कायनेटिका टू या श्रेणीच्या माध्यमातून केले आहे. कायनेटिका टू श्रेणीतील उत्पादने समकालीन क्रीडाशैलीतील मॉडेलमध्ये संपूर्ण उत्क्रांती करून विस्तारित व्हिस-टेक डिझाइनमार्फत रूपांतरणात्मक ऊर्जा देणारी आहेत. एसएस२१ झिक कायनेटिका टू श्रेणी १ मार्चपासून, shop4reebok.com ही वेबसाइट आणि निवडक स्थानिक रिटेलर्सच्या माध्यमातून, जगभरात उपलब्ध झाली आहे.

  २०२० च्या स्प्रिंगमध्ये बाजारात आलेल्या रीबॉकच्या झिग कायनेटिका फ्रँचायझीने ब्रॅण्डच्या ऐतिहासिक झिगटेक कामगिरी तंत्रज्ञानामध्ये नवीन युगाची सुरुवात केली. २०१० मध्‍ये प्रथम सर्वांसमोर आल्यापासून या श्रेणीने नवोन्मेष, शैली आणि कार्यात्मकतेच्या सर्व सीमा विस्तारल्या आहेत.

  आता आजच्या नवीन श्रेणीबद्दल बोलू- झिग कायनेटिका आयकनिक ‘झिगझॅग’चे अधिक शिस्तबद्ध स्वरूप आहे. यातील मिड-आउटसोलमध्ये अत्यंत सुसंगत अशी तीन भागांची प्रणोदन (पुढे ढकलणे) प्रणाली आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर हे पादत्राण घालणाऱ्याच्या पायातील गतीशील ऊर्जा एका दिशेने प्रवाहित होते आणि परतही मिळते:

  • फ्लोटराइड इंधन आणि फ्लोटराइड ऊर्जा: आतमधील बाउन्सी फोम दैनंदिन वापरासाठी गुबगुबीतपणा आणि आराम देते.

  • झिग एनर्जी बॅण्ड्स: रबर बॅण्ड आउटसोल प्रणाली प्रत्येक पाऊल टाकले असता आकुंचन आणि प्रसरण पावते.

  • झिग एनर्जी शेल: जाड व्हिस-टेक मिडसोल गतीशील ऊर्जा एका दिशेने प्रवाहित करते आणि नंतर परत आणते.

  २०२० साठी डिझाइनच्या मर्यादा वाढल्यामुळे झिग कायनेटिका टू एक अत्यंत मर्यादित साहित्यातून तयार केलेले उत्पादन आहे. यात बुटाचे वजन ७० ग्रॅम्सने कमी करण्यात आले आहे, ऊर्जादायी रंगांचा वापर करण्यात आला आहे आणि दृश्य तंत्रज्ञानाचा वापर प्राधान्याने करून स्केलेटल रचना विकसित करण्यात आली आहे. परिणामी कोणत्याही अपेक्षांना पुरून उरणारे एक अप्रतिम जीवनशैली उत्पादन तयार झाले आहे. हे वापरणाऱ्याला चालताना त्यांची स्वत:ची ऊर्जा पुरेपूर उपयोगात आणता येईल आणि सर्वांच्या पुढे राहणे शक्य होईल.
  एसएस२१ झिग कायनेटिका टू उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • झिग कायनेटिका टू “डिजि-स्पेस”: भविष्यकालीन सौंदर्याच्या मापदंडामुळे शारीरिक-डिजिटल दुही भरून निघते, आपल्या नवीन आभासी जगामध्ये ट्रायल अँड एरर पद्धतीने जगताना कधीही येणाऱ्या आकस्मिक क्षणांची काळजी घेते. फीचर्ड मॉडेल्समध्ये युनिसेक्स ब्लॅक/ऑरेंज तसेच खास स्त्रियांसाठी ब्लॅक/ब्ल्यू/पर्पल (एफएक्स9405) यांसह अन्य काही उत्पादनांचा समावेश आहे. जगभरात १ मार्चपासून उपलब्ध.

  • झिग कायनेटिका टू “एआरएस”: विपर्यस्त, अमूर्त ग्राफिक एग्झिक्युशनमुळे खास स्त्रियांसाठी असलेल्या या सुव्यवस्थित सिल्हुएटला वैचित्र्यपूर्ण सौंदर्य प्राप्त झाले आहे. टोनल ग्रे/व्हाइट डिझाइनमुळे हिरवेगार उंचवटे अधिक उठून दिसतात. १ मार्चपासून जगभरात उपलब्ध.

  • झिग कायनेटिका टू “डिजि-वार्प”: बाजूच्या आणि मधल्या भागातील विस्तारित रीबॉक व्हेक्टरमुळे डिजिटल सौंदर्य वाढले आहे. मस्त ग्रे छटेतील वरील भाग आणि स्वच्छ पांढरे मिडसोल व आउटसोल आणि सर्वत्र हायलायटर ग्रीनचे उंचवटे अशा रंगांत हे बूट आहेत. १ मार्चपासून जगभरात उपलब्ध.

  झिग कायनेटिका टूसह रीबॉक झिग डायनॅमिका, झिग कायनेटिका २१ आणि झिग कायनेटिका एज ही उत्पादनेही लाँच करत आहे. ही उत्पादने कोअर ब्लॅक, व्हाइट, निऑन मिंट, कोरल यांसारख्या टवटवीत रंगांमध्ये असतील. झिग समूह नवोन्मेषकारी डिझाइन्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दिवसभर आराम वाटावा आणि बिनधास्त फॅशन केल्याची भावना यावी म्हणून ऊर्जायुक्त कुशनिंग देण्यात आले आहे.

  झिग उत्पादने पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आणि युनिसेक्स सायझिंगमध्ये ७,५९९/- रुपयांपासून रीबॉक स्टोअर्समध्ये तसेच shop4reebok.com या वेबसाइटवर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ट, अजिओ आणि टाटाक्लिक यांच्यासारख्या अन्य फॅशन रिटेलर्सवरही या नवीन उत्पादनांची विस्तृत श्रेणी बघायला मिळेल.