प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. तर, त्याच दिवशी ५०० आणि २००० रुपयांची नवी नोट चलनात येईल, अशी घेषणा केली. नोटबंदीनंतर देशातील बँकांबाहेर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. नोटा बदलून घेताना अनेकांना जीव गमवावा लागला होता.

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०२६ रोजी देशात त्याच दिवसाच्या रात्री १२ वाजेपासून नोटबंदी लागू केली. नोटबंदीत चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं यावेळी मोदी सरकारकडून सांगण्यात आले होते.या नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.

    आता आरबीआयचा नवा आदेश
    भारतीय रिझर्व्ह बँकेने आता देशातील बँकांना ८ नोव्हेबंर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या काळातील सीसीटीव्ही फुटेज जतन करुन ठेवण्यास सांगतिलं आहे. बँकांच्या शाखांमधील सीसीटीवी रेकॉर्डिंग पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने हा आदेश नोटबंदीच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांवर कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणांना मदत व्हावी, म्हणून दिला आहे.नरेंद्र मोदी सरकारनं नोटबंदी केली तेव्हा बाजारात १५.४१ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. त्यापैकी १५.३१ लाख कोटी रुपयांच्या नोटा सरकारकडे परत आल्या होत्या.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या. तर, त्याच दिवशी ५०० आणि २००० रुपयांची नवी नोट चलनात येईल, अशी घेषणा केली. नोटबंदीनंतर देशातील बँकांबाहेर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. नोटा बदलून घेताना अनेकांना जीव गमवावा लागला होता. तर, त्यावेळी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराबद्दल तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना त्यांच्या शाखांमधील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.