“अबे पाच ट्रिलियन इकनॉमी बोलके सब बिकवा दिया रे” ट्वीटरवर #Resign_PRimeMinister ट्रेंड

  सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होइल सांगता येत नाही. एखाद्या रंकाचा एका रात्रीत राव करण्याची ताकद या सोशल मीडियात आहे. जे मोदी सरकार सोशल मीडियाच्या आधारे सत्तेत आल्याचं म्हटलं जातं आता त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल नेटवर्किंगवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

  काँग्रेस आणि विरोधकांच्या समर्थकांनी ट्विटरवर #Resign_PRimeMinister हा हॅशटॅग वापरुन आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. एकीकडे देशामधील पेट्रोल, खाद्यतेल, भाज्यांचे दर वाढलेले असतानाच दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था, नोकऱ्यांची संधी, रोजगार आणि जीडीमध्ये घट होतानाचे चित्र दिसत असल्याची टीका केली जात आहे. #Resign_PRimeMinister या हॅशटॅगमधील प्राइम शब्दातील पी आणि आर ही अक्षर मुद्दाम कॅपीटलमध्ये वापरुन मोदी केवळ जाहिरातबाजी करणारे पंतप्रधान असल्याचा टोला लगावण्यात आलाय.

  1/7

  2/7

  3/7

  4/7

  5/7

  6/7

  7/7

   

  पाच ट्रिलीयन इकनॉमीच्या नावाखाली सरकारने सारं काही विकून टाकलं आहे, कोरोनाच्या नाहीतर  देशाला मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्याची गरज आहे, मोदी हे केवळ जाहिराती करतात, जनता त्रस्त… भाजपा मस्त.., ब्लू टीकसाठी लढतात लसींसाठी नाही या आणि अशा अनेक पद्धतीच्या टीका सोशल मीडियावर करण्यात आल्या आहेत.