कुठे लॉकडाऊन, कुठे जमावबंदी, कुठे संचारबंदी, जाणून घ्या कुठल्या राज्यात काय निर्बंध

देशातील १२ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या राज्यांनी कुठे लॉकडाऊन, कुठे जमावबंदी तर कुठे संचारबंदी लागू केलीय. त्यामुळे देशात मिनी लॉकडाऊनचं चित्र निर्माण झालं असून लॉकडाऊनच्या दिशेनं आपली पावलं पडत असल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये राज्यव्यापी नाईट कर्फ्यु लावण्यात आलाय. गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये अंशतः निर्बंध लावण्यात आलेत.

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं असून जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती पाहून त्या त्या राज्य सरकारांनी उपाययोजना करायला सुरुवात केलीय.

    देशातील १२ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या राज्यांनी कुठे लॉकडाऊन, कुठे जमावबंदी तर कुठे संचारबंदी लागू केलीय. त्यामुळे देशात मिनी लॉकडाऊनचं चित्र निर्माण झालं असून लॉकडाऊनच्या दिशेनं आपली पावलं पडत असल्याचं सांगितलं जातंय. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये राज्यव्यापी नाईट कर्फ्यु लावण्यात आलाय. गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये अंशतः निर्बंध लावण्यात आलेत. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन करण्यात आलंय.

    उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये गुरुवार रात्रीपासून नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा करण्यात आलीय. लखनऊ, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, कानपूर, वाराणसी आणि प्रयागराज या शहरांमध्ये गुरुवारपासून नाईट कर्फ्यु लावण्यात आलाय. तर जम्मू काश्मीरमधील जम्मू, उधमपूर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बडगाम, अनंतनाग आणि कुपवाडा या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्युची घोषणा कऱण्यात आलीय.

    गुजरातमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत चालली असून अंत्यसंस्कारासाठी स्मशानं कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यात अनेक राज्यांनी लसीचा तुटवडा असल्याची तक्रार केलीय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधलं लसीकरण त्यामुळं थांबवण्यात आलंय.