शेतकरी आंदोलनावरून राजकारण तापले, भाजप आणखी एक मित्र पक्ष गमावणार ?

उद्या होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अनेक पक्षांनी एनडीपासून फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. यात आताा राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीची भर पडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी शेतकरी आंदोलनासंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती पक्षाचेे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे.(rpl may leave nda after discussion scheduled tomorrow)

शेतकरी आंदोलनाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहे. उद्या होणाऱ्या भारत बंद आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. अनेक पक्षांनी एनडीपासून फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीची भर पडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी शेतकरी आंदोलनासंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याची माहिती पक्षाचेे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिली आहे.(rpl may leave nda after discussion scheduled tomorrow)

मोदी सरकारने अधिवेशनामध्ये ३ कृषी विधेेयके मंजूर करुन घेतली. ही विधेयके मंजूर झाल्यावर त्याचं कायद्यात रुपांतर झालं आहे. या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी सरकार चर्चा करत आहे. मात्र तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला अनेक राजकीय पक्षांचा पाठींबा आहे. भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार हनुमान बेनीवाल यांनी असे स्पष्ट केले आहे की, एनडीएमध्ये राहायचं की नाही याविषयी उद्या निर्णय होईल. भारत बंदला राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा पााठिंबा आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी राजस्थानमध्ये भाजपसोबत आहे. जर हा पक्ष एनडीएमधून  बाहेर पडला तर भाजपाने  आणखी एक मित्रपक्ष गमावला, असं म्हणावं लागेल. याआधी पंजाबमधील शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर पडला आहे.