Rs 99, Rs 499, or Rs 999; Why is the price of goods less than one rupee?

तुम्ही एखाद्या मॉलमध्ये किंवा सुपरमार्केटमध्ये खरेदीला जाता, तेव्हा तुम्हाला आवडलेल्या शर्टची, ड्रेसची, किंवा एखाद्या वस्तूची किंमत 99 रुपये, 499 रुपये, किंवा 999 रुपये अशी असते. आता या वस्तूची किंमत पूर्ण शंभर रुपये, किंवा पूर्ण पाचशे किंवा हजार रुपये का नसते? या किंमतीमध्ये एक रुपया कमी कश्यासाठी असतो, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? वस्तूंची किंमत एक रुपया कमी ठेवण्याची दोन कारणे आहेत. पण ही कारणे लोकांना ठाऊक नसतात, कारण ती जाणून घेण्याइतकी जिज्ञासा त्यांचामध्ये नसते, किंवा त्यांनी ही गोष्ट कधी विचारातच घेतलेली नसते. पण वास्तविक ही माहिती अतिशय रोचक आहे.

    वस्तूंची किंमत एक रुपया कमी असण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे ‘सायकोलॉजीकल मार्केटिंग स्ट्रॅटजी’ हे आहे. साध्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर पाचशे रुपये किंमत आपल्याला ऐकताना जास्त वाटते. पण हीच किंमत चारशे नव्याण्णव रुपये म्हटली, की ती कमी वाटते, ही बहुतेक ग्राहकांची मानसिकता आहे. हीच मानसिकता लक्षात घेऊन वस्तूंची किंमत एका रुपयाने कमी ठेवली जाते. ग्राहकाला ती वस्तू विकत घेण्याकडे आकर्षित करण्याचा उद्देश यामागे असतो.

    वस्तूची किंमत एक रुपया कमी ठेवण्यामागे विक्रेत्याचा किंवा उत्पादकाचा फायदा असतो. 499 रुपये किंमतीची वस्तू घेण्यासाठी तुम्ही पाचशे रुपये देता, पण त्यातील 499 रुपये कापून घेऊन उरलेला एक रुपया तुम्हाला क्वचितच परत मिळतो. हा जास्तीचा एक रुपया विक्रेत्याच्या / उत्पादकांच्या खिशामध्ये जमा होत असतो. असे एक एक रुपया मिळून दिवसभरामध्ये किती अतिरिक्त रुपये विक्रेत्यांना निव्वळ नफा महणून मिळत असतील, याची कल्पना तुम्हीच करा. अश्या प्रकारच्या कल्पना विक्रेत्यांना, मार्केट एक्स्पर्टस् द्वारे देण्यात येत असतात. या कल्पनेतून ग्राहकही संतुष्ट राहतो आणि प्रत्येक नगामागे एक रुपयाचा नफा झाल्यामुळे विक्रेता किंवा उत्पादक ही संतुष्ट राहतो.

    हे सुद्धा वाचा