court

एक रशियन महिला(russian woman) भारतात आली. गुजरातच्या(gujrat crime) एका मसाज पार्लरमध्ये काम करायला तिने सुरुवात केली. तिथे तिचे मसाज पार्लरच्या मालकासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून महिला गर्भवती राहून तिने एका मुलाला जन्म दिला. ते बाळ या मालकाचं असल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या प्रकरणी मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीनं कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.

बडोदा :  मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका रशियन महिलेने(russian woman) मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीविरोधात गुजरातच्या उच्च न्यायालयात तक्रार दाखल(complaint in high court) केली आहे. मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या रशियन महिलेचे आणि मालकाचे अनैतिक संबंध होते. त्याविरोधात मसाज पार्लर मालकाच्या पत्नीनं मालक आणि रशियन महिलेविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणाचा निकाल येणे अद्याप बाकी आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०१४ रोजी एक रशियन महिला भारतात आली. गुजरातच्या एका मसाज पार्लरमध्ये काम करायला तिने सुरुवात केली. तिथे तिचे मसाज पार्लरच्या मालकासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून महिला गर्भवती राहून तिने एका मुलाला जन्म दिला. ते बाळ या मालकाचं असल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या प्रकरणी मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीनं कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.

पत्नीने असे म्हटले आहे की, रशियन महिलेनं माझ्या पतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. माझ्यावर घटस्फोटासाठी दबाव आणला जात आहे.  दोघांनीही मला मारहाण देखील केली असल्याचं पार्लर मालकाच्या पत्नीनं एफआयआरमध्ये सांगितले आहे. रशियन महिलेला भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोपही पार्लर मालकाच्या पत्नीने केला आहे.

मसाज पार्लरच्या मालकाच्या पत्नीनं दाखल केलेल्या एफआयआर विरोधात आता रशियन महिलेनं गुजरातच्या उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मसाज पार्लरच्या मालकानेदेखील अटकेपासून सुटका मिळावी, यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायालयानं १५ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली आहे. आता पुढे काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.