कोरोनानंतर आता जगावर जीवघेण्या दुसऱ्या आजाराचं संकट, रशियाच्या डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

कोरोनाशी सामना करणाऱ्या जगभरातील नागरिकांसाठी एक नव्या संकटाची बातमी आहे. वाढते जागातिक तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगावर ब्यूबोनिक प्लेगचे संकट घोंगावत असल्याचा इशारा रशियाच्या का मोठ्या डॉक्टरांनी दिला आहे. या रोगाने यापूर्वीही जगभरात लाखो जणांचे प्राण घेतले आहेत.

    मॉस्को : कोरोनाशी सामना करणाऱ्या जगभरातील नागरिकांसाठी एक नव्या संकटाची बातमी आहे. वाढते जागातिक तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगावर ब्यूबोनिक प्लेगचे संकट घोंगावत असल्याचा इशारा रशियाच्या का मोठ्या डॉक्टरांनी दिला आहे.

    या रोगाने यापूर्वीही जगभरात लाखो जणांचे प्राण घेतले आहेत. या जीवघेण्या रोगाने आत्तापर्यंत तीन वेळा जगावर आक्रमण केले आहे. पहिल्या वेळी या रोगामुळे ५ कोटी जणांचे प्राण गेलेत, तर दुसऱ्यावेळी संपूर्ण युरोपाली एक तृतियांश नागरिक याचे बळी पडले होते. तिसऱ्या वेळी या आजाराने ८० हजार जणांचे प्राण घेतले आहेत. या आजाराला ब्लॅक डेथ असेही म्हटले जाते.

    रशियाच्या डॉक्टर अन्ना पोपोवा यांच्या इशाऱ्यानुसार, ग्लोबल वॉर्मिंग सातत्याने वाढत असल्यामुळे ब्यूबोनिक प्लेग पुन्हा परतण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत रशिया, चीन आणि अमेरिकेत ब्लॅक डेथच्या घटना समोर आल्या आहेत. पोपोवा यांच्या दाव्यानुसार अफ्रिकेत याचे भयंकर रुप येत्या काळात दिसण्याची शक्यता आहे. अफ्रिकेत हा प्लेग झपाट्याने पसरेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. हा रोग पसरवणाऱ्या माश्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर जागतिक तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

    यर्सिनिया पेस्टिस बैक्टिरियम या बॅक्टेरियापासून ब्यूबोनिक प्लेग होतो. हा विषाणू मानवी शरिरात रक्त आणि फुफुसांवर हल्ला करतो. यामुळे हाताची बोटे काळी पडतात, नाकही काळे पडते. या रोगामुळे खूप ताप येतो, शरिरात वेदना होतात आणि नाडी जोरात धावू लागते. दोन तीन दिवसातं सरिरावर गाठी येतात, १४ दिवसांत या गाठी पिकतात, त्यानंतर शरिरात असहाय्य वेदना होऊ लागतात. ब्युबोनिक प्लेग पहिल्यांदा जंगली उंदरांना होतो. या उंदरांच्या मृत्यूनंतर पिसवांद्वारे हा मनुष्यांत संक्रमित होतो. उंदीर मेल्यानंतर दोन ते तीन आठवड्यात हा आजार मानवी समुहात गतीने पसरताना दिसण्याची शक्यता आहे. जगभरात २०१० ते २०१५ या काळात ब्युबोनिक प्लेगच्या ३२४८ घटना समोर आल्या आहेत. त्यात ५८४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.