सचिन पायलट यांनी घेतली राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट

राजस्थानमध्ये महिनाभर सुरु असलेल्या सत्ता संघर्षानंतर आज काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे.काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या भेटीमुळे राजस्थानमधील परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. 

राजस्थानमध्ये महिनाभर सत्ता नाट्य सुरु होते. राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत आणि पायलट यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले होते. गेहलोत यांचे सरकार अस्थिर होण्याचे संकट निर्माण झाले होते.  आता काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. पायलट काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्याही संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.