सॅमसंग पार्टनर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटी, सॅमसंग इनोव्हेशन लॅब सुरु करणार; सहयोगपूर्ण संशोधन आणि प्रशिक्षणावर भर देणार

लॅबमध्ये, डीटीयुमधील विद्यार्थी आणि फॅकल्टी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रशिक्षण आणि संयुक्त संशोधन सहयोगाअंतर्गत ॲप्लिकेशन फ्रेमवर्क, मल्टीमीडिया, आरोग्य व सुरक्षा या डोमेन्स मध्ये कार्य करुन विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-रेडी ठेवण्याचे काम करणार आहे.

  • सॅमसंग आर अँड डी इंस्टिट्युट, नोएडा चे इंजिनियर्स डीटीयुच्या विद्यार्थी व फॅकल्टी बरोबर सहयोगपूर्ण संशोधन प्रकल्पांवर काम करणार

दिल्ली : सॅमसंग इंडियाने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (डीटीयु) येथे, सॅमसंग इनोव्हेशन कँम्पस इनिशिएटीव्ह अंतर्गत सॅमसंग इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन केले व त्याच्या अलिकडील व्हिजन #PoweringDigitalIndia चा भाग असलेल्या गव्हर्नमेंट स्किल इंडियासाठी त्यांची बांधीलकी अधिक मजबूत केली.

लॅबमध्ये, डीटीयुमधील विद्यार्थी आणि फॅकल्टी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रशिक्षण आणि संयुक्त संशोधन सहयोगाअंतर्गत ॲप्लिकेशन फ्रेमवर्क, मल्टीमीडिया, आरोग्य व सुरक्षा या डोमेन्स मध्ये कार्य करुन विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-रेडी ठेवण्याचे काम करणार आहे.

याबरोबर, सॅमसंगकडे आता संपूर्ण भारतात सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस इनिशिएटिव्ह, ज्यास पूर्वी सॅमसंग डिजिटल ॲकॅडमी म्हणून ओळखले जात असे, त्याअंतर्गत आठ टेक्निकल लॅब्स आहेत.

लॅब चा भाग म्हणून, सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्युट, नोएडा(एसआरआय-एन) येथे इंजिनीयर्स डीटीयु विद्यार्थी व फॅकल्टी यांच्या बरोबर सहयोगपूर्ण संशोधन प्रकल्पांमध्ये स्मार्टफोन डोमेन्स वर आर्टीफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आणि कंप्युटर व्हीजन सारख्या कटींग एज टेक्मॉलॉजी क्षेत्रांमध्ये काम करणार आहेत.

आतापर्यंत, 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एसआरआय-एन इंजिनीयर्स बरोबर संशोधन प्रकल्पांवर काम केले असून प्रशिक्षण प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांना या प्रकल्पांवर एसआरआय-एन इंजिनीयर्स बरोबर रीसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्यात येते.

डीटीयु येथे सॅमसंग इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन प्रोफेसर योगेश सिंग, व्हाइस चँसलर, डीटीयु, क्युनग्युन रु, व्यवस्थापकीय संचालक, एसआरआय-एन, प्रोफेसर रजनी जिंदाल, विभाग प्रमुख, कंप्युटर सायन्स व इंजिनियरींग, डीटीयु आणि कंप्युटर सायन्स व इंजिनीयरींग च्या फॅकल्टी आणि डीटीयु येथील सॅमसंग इनोव्हेशन लॅबचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. दिव्यशिखा सेठीया यांच्याद्वारे करण्यात आले.

“एसआरआय-एन कोलॅबरेटीव्ह रीसर्च प्रोजेक्ट्स वर अनेक वर्षांपासून प्रीमियर युनिव्हर्सीटीज बरोबर कार्य करत आहे आणि आम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होत आहेत. आम्ही डीटीयु येथील नवीन लॅब बद्दल अतिशय उत्तेजित आहोत, जेथे आमचे इंजिनियर्स विद्यार्थ्यांना कटींग एज टेक्नॉलॉजीबद्दल शिकवणार आहेत, आणि विद्यार्थ्यांना डिसरप्टीव्ह इनोव्हेशन वर काम करण्यास मदत करणार आहेत. आम्हाला खात्री आहे हे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगार मिळवण्यासाठी तयार करेल,” असे कुंगयुन रु, व्यवस्थापकीय संचालक,सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट, नोएडा म्हणाले.

“टुगेदर फॉर टुमॉरो ! एनेबलिंग पीपल या आमच्या सीटीझनशीप व्हिजनचा भाग म्हणून सॅमसंग जगभरातील तरुणांना उत्तम शैक्षणिक व अध्ययनाच्या संधी मिळवून देते. डीटीयु येथील नवीन लॅब, जो सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस इनिशिएटिव्ह चा भाग आहे, विद्यार्थ्यांना डिजिटल टेक्नॉलॉजीज च्या वाढत्या संधींचा लाभ घेण्यास सहकार्य करते, व डिजिटल इंडिया ला समर्थन देण्याच्या सॅमसंग च्या तत्वज्ञानासाठी त्यांना प्रोत्साहन देते,” असे पार्थ घोष, कॉर्पोरेट सीटीझनशीप, सॅमसंग इंडिया म्हणाले.

“सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस हा उत्कृष्ठ इनिशिएटिव्ह असून उत्तम ग्लोबल टेक्नॉलॉजी लीडर्स पैकी एक असलेल्या, सॅमसंग व डीटीयु ला कटींग एज टेक्नॉलॉजी करिता समर्पित लॅब तयार करण्यासाठी एकत्र आणले आहे. डीटीयु मध्ये अत्यंत हुशार विद्यार्थी असून त्यांना आव्हाने स्वीकारणे प्रीय आहे व त्यांच्याकडे अभिनव कल्पना असतात. या लॅब मुळे आमच्या विद्यार्थ्यांना काही आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सखोल ज्ञान प्राप्त होते, व ते सॅमसंग इंजिनीयर्स बरोबर संयुक्तपणे त्यांच्या प्रकल्पांवर नवीन कल्पनांसह कार्य करुन, अमूल्य औद्यौगिक अनुभव प्राप्त करतात व त्यांना आपल्या कक्षा रुंदावता येतात,” असे प्रोफेसर योगेश सिंग,व्हाईस चांसलर, डीटीयु म्हणाले.

सॅमसंग इंजिनीयर्स आणि विद्यार्थी अनेक सस्टेनेबल रीसर्च प्रोजेक्ट्स वर वास्तविक जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार आहेत ज्याचा उपयोग समाजाला होईल.

सहयोगपूर्ण प्रकल्प/कोलॅबरेटीव्ह प्रोजेक्ट्स डीटीयु मधील B.Tech, M.Tech आणि Ph.D च्या विद्यार्थ्यांसाठी खुले असतील, ज्यामध्ये प्रकल्पाच्या शेवटी त्यांच्या सहयोगासाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

लॅब चा भाग म्हणून, एसआरआय-एन इंजिनीयर्स डीटीयु विद्यार्थ्यांना अप्लिकेशन फ्रेमवर्क, मल्टीमीडिया, कटींग एज टेक्नॉलॉजी आधारित आरोग्य व सुरक्षा यांसारख्या डोमेन्स अंतर्गत आर्टीफिशियल इंटेलीजन्स, मशिन लर्निंग आणि कंप्युटर लर्निंग सारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देतील.

सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस हा कंपनीचा ग्लोबल सिटिझनशीप प्रोग्राम आहे ज्याचे ध्येय देशातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानात कुशल करुन प्रविणतेची दरी भरुन काढणे आहे. सॅमसंग ने आतापर्यंत सात सॅमसंग इनोव्हेशन लॅब्स आयआयटी-दिल्ली, आयआयटी-कानपुर, आयआयटी-हैदराबाद, आयआयटी-खरगपूर, आयआयटी-रुडकी आणि आयआयटी-गुवाहाटी आणि आयआयटी-जोधपूर येथे स्थापन केल्या आहेत. आतापर्यंत या लॅब्स कडून 1,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.