ग्राहकांच्या खिशाला कात्री! पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आज तेरावा दिवस असून पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आज तेरावा दिवस असून पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाल्याचे संकेत मिळत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. परंतु मागील मे महिन्यापेक्षा यंदाच्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५६ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत दरवाढीनंतर पेट्रोलचा दर हा ७८.३७ रूपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर हा ७७.०६ रूपये प्रतिलिटर इतका झाला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे.

काल गुरुवार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ८१ पैशांची वाढ करण्यात आली होती. तर डिझेलच्या दरात ४३ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर हा ७७ रूपये ८१ पैसे प्रतिलिटर इतका होता. तर डिझेलचा दर हा ७६ रुपये ४३ पैसे प्रतिलिटर होता. त्यामुळे  आजच्या दिवसात पुन्हा एकदा अधिक दरवाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच मुंबईत आज पेट्रोलच्या दरात ८५.२१ रूपये प्रतिलिटर वाढ झाली आहे.