राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ ; काय आहे भेटीमागचं कारण ?

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते ही अफवा असल्याचे म्हणत आहे. तर दुसरीकडे खुद्द अमित शहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाही, असं म्हणून नवा खुलासा केला आहे.

    मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या अहमदाबाद येथील (Ahmadabad) गुप्त भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते ही अफवा असल्याचे म्हणत आहे. तर दुसरीकडे खुद्द अमित शहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाही, असं म्हणून नवा खुलासा केला आहे.

    नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांना शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल विचारले असता अमित शहा म्हणाले की, ‘प्रत्येक गोष्ट ही सार्वजनिक करता येत नाही’ अमित शहांनी मोजक्याच शब्दांत उत्तर दिल्यामुळे ही भेट झाली असल्याचा एका प्रकारे दुजोरा मिळत आहे.