कोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा देशासाठी मंत्र

आज संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट उभं राहलं आहे. या कोरोना विषाणूच्या संकटात १३० कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारत हे स्वप्न संकल्पमध्ये परिवर्तीत झालं आहे. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे

कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण देशात घोंघावत आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा थोडा वेगळा असणार आहे. दरवर्षी देशभरातील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. परंतु तो कार्यक्रम यंदा होणार नाही. दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७४  व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. तसेच सुरक्षा दलांमधला प्रत्येक जण देशाच्या, देशांच्या नागरिकांचं संरक्षण करतात, आज त्यांना नमन करण्याचा दिवस आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणाला सुरूवात केली. 

आज संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट उभे राहले आहे. या कोरोना विषाणूच्या संकटात १३० कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भर भारत हे स्वप्न संकल्पामध्ये परावर्तित झालं आहे. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे.

तरुणांच्या, महिलांच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे. भारताने एखादी गोष्ट ठरवली की, तो ती करून दाखवतो. म्हणूनच जगाला याबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतासारख्या देशाचं योगदान वाढणं, ही आजची गरज आहे.  देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे.