शेतकरी प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उपोषणाचा  इशारा

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरीत तोडगा काढावा. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या जानेवारी महिन्यापासून आपण पुन्हा एकदा दिल्ली येथे उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरीत तोडगा काढावा. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या जानेवारी महिन्यापासून आपण पुन्हा एकदा दिल्ली येथे उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे. अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला याबाबत एक पत्रही लिहिले आहे. मात्र, अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनाची तारीख, स्थळ आणि वेळ याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.

 

अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेले तीन वर्षे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारने अद्याप एकाही मुद्द्यावर समाधानकारक भूमिका घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आपण आंदोलन करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांबाबत अण्णा हजारे यांनी या आधीही आंदोलन केले आहे.