प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर नोवाव्हॅक्स लशीची चाचणी(Vaccine Trial In July) घेऊ शकते. एएनआयने म्हटले आहे की, सीरम संस्था सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा करत आहे.

  सीरम संस्था(Serum Institute Of India) मुलांवर नोवाव्हॅक्स(Novavax Vaccine trial) लशीची चाचणी घेण्याची योजना तयार करत आहे. जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर नोवाव्हॅक्स लशीची चाचणी(Vaccine Trial In July) घेऊ शकते. एएनआयने म्हटले आहे की, सीरम संस्था सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा करत आहे.


  दरम्यान, लस निर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने दावा केली आहे की, त्यांची लस करोनाच्या व्हेरिअंट विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

  अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्सने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत २०० कोटी लशींची निर्मिती करण्याचे ठरवण्यात आले.

  कंपनीने म्हटले की, लस कोरोनाविरोधात ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही समोर आलं आहे.

  अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असल्याने, तिथे लस तुटवडा जाणवत आहे. नोवाव्हॅक्स लशीची साठवण आणि वाहतूक करणे सोपे असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यात ही लस मोठं योगदान देण्याची शक्यता आहे.

  कंपनीने सांगितले की, सप्टेंबरच्या शेवटापर्यंत अमेरिका-युरोप व अन्य ठिकाणी लसीकरणासाठी या लशीला मंजुरी मिळवी या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि तोपर्यंत एका महिन्यात दहा कोटी लस निर्मिती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.