decontamination-of-the-science-behind-covid-19-vaccination-nrvb

रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट (Serum Institute Will Produce Sputnik V) यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

    भारतात सध्या कोविशिल्ड(Covisheild) आणि कोवॅक्सिन(Covaxin) यासोबतच स्पुटनिक व्ही(Sputnik V) आणि मॉडर्ना(Moderna) या लसींना(Vaccine) देखील मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा(Vaccine Supply) होण्याची शक्यता आहे.

    रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट (Serum Institute Will Produce Sputnik V) यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.

    भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे ३० कोटी डोस तयार करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात Russian Direct Investment Fund चे सीईओ कायरिल दिमित्रिएव्ह म्हणाले, “सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. काही इतर भारतीय उत्पादक देखील उत्पादनासाठी तयार आहेत”.

    यासंदर्भात कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि सिरम इन्स्टिट्युट यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार भारतात वर्षाला ३० कोटी स्पुटनिक व्ही लसीचे डोस उत्पादित करण्याचा मानस आहे. यापैकी लसीच्या डोसचा पहिला हफ्ता येत्या सप्टेंबर महिन्यात येईल. यासाठी सिरम इन्स्टिट्युटला याआधीच लसीसाठीच्या सेल्स आणि व्हेक्टर सॅम्पल्स मिळाले असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. आत्तापर्यंत स्पुटनिक व्ही लसीटी जगातल्या ६७ देशांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. जगातली ३५० कोटी लोकसंख्या या देशांमध्ये राहाते, असं देखील या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.