Pawar-Thackeray worried about winning the mini assembly seat

प्रश्नमने केलेल्या सर्वेक्षनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केल्यामुळे सर्वाधिक पसंती मिळवली आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलं आहे. उद्धव ठाकरे हे देशातील १३ राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.

    प्रश्नम या संस्थेनं १३ राज्यांमधून मुख्यमंत्र्यांबाबत त्रैमासिक सर्व्हे नुकताच जाहीर केला. या सर्व्हेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना शाबासकी दिली.

    काय म्हणाले शरद पवार
    उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीदरम्यान पवारांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

    दरम्यान, प्रश्नमने केलेल्या सर्वेक्षनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाकाळात उत्तम कामगिरी केल्यामुळे सर्वाधिक पसंती मिळवली आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलं आहे. उद्धव ठाकरे हे देशातील १३ राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांची कामगिरी ४९ टक्के मतदारांनी कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे.