शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तर्क-वितर्कांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन नेत्यांची भेट झाली. जवळपास 1 तासांहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या अधिवेशनात कृषी कायद्यासंबंधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन नेत्यांची भेट झाली. जवळपास 1 तासांहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

    दरम्यान या भेटीत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी आणि शरद पवार यांच्या बैठका कमी झाल्या होत्या. शरद पवार यांच्या शस्त्रक्रियानंतर या दोन नेत्यांची पहिलीच भेट आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या अधिवेशनात कृषी कायद्यासंबंधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे.

    सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पवारांनी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेतल्यानं दिल्लीत कोणतं राजकारण शिजतंय याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती.