यूपीएचं नेतृत्त्व शरद पवारांकडे ? मोदी-शाहांच्या समोर पक्षाचा डाव चालेना

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात यूपीएचं नेतृत्त्व शरद पवारांकडे (Sharad Pawar) द्यायला हवं, असं सांगण्यात आलं आहे. वर्तमान काळात युपीएचं नेतृत्त्व सोनिया गांधी यांच्याकडे आहे. शिवसेनेच्या या मागणीनंतर काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena)  यांच्यात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तीन कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Agitation)  सुरू आहे. परंतु शिवसेनेने संयुक्त पुरोगामी आघाडी(UPA)च्या अध्यक्षांना बदलण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात यूपीएचं नेतृत्त्व शरद पवारांकडे (Sharad Pawar) द्यायला हवं, असं सांगण्यात आलं आहे. वर्तमान काळात युपीएचं नेतृत्त्व सोनिया गांधी यांच्याकडे आहे. शिवसेनेच्या या मागणीनंतर काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena)  यांच्यात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याबाबत एक योजना लागू करण्यासाठी सांगण्यात आले होते.

सोनिया गांधींनी यूपीएच्या अध्यक्षपदाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली. तसेच त्या काँग्रेसच्या हंगाम अध्यक्षा सुद्धा आहेत. परंतु यामध्ये काही बदल करावे लागतील. तसेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी पुढाकार घ्यावा. असं सामनाच्या अग्रलेखामध्ये सांगण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा, पण…

काही विरोधी पक्षांनी युपीएमध्ये सहभाग घेतलेला नाहीये. त्या पक्षांना आपल्या समवेत घेऊन पुढे जावे लागेल. काँग्रेस पक्षाचा दुसरा अध्यक्ष कोण होणार? हे अद्यापही निश्चित नाहीये. परंतु राहुल गांधी शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत. तरीसुद्धा कुठेतरी कमी असल्याचं जाणवत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या कणखर आणि सर्वसामान्य नेत्याला पुढे आणावे लागेल. ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने रणनीती आखली आहे. ती रणनीती पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर फोल ठरत आहे. सोनिया गांधींना पाठिंबा देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा आणि अहमद पटेल हयात नाहीयेत. त्यामुळे शरद पवार यांनाच पुढे आणावे लागेल. असं सामनाच्या अग्रेलखात म्हटलं आहे.