अदानी ग्रृपचे शेअर्स कोसळले, ‘या’ तीन कंपन्यांनी केली होती गुंतवणूक ?

NSDL ने (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने) अदानी ग्रृपशी निगडीत असलेल्या तीन परदेशी गुंतवणुकदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स ढासळले आहेत. या तीनही कंपन्यांची अदानी समुहामध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचं समजतंय.

    हर्षद मेहताचा सगळा घोटाळा उघडकीस आणणारी महिला पत्रकार सुचेता तुम्हाला आठवते का? त्याच सुचेता दलाल यांनी आता दुसऱ्या घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी 12 जूनला एक ट्वीट करत या संदर्भात हिंट दिली होती. त्यानंतर आज 14 जूनला अदानी समुहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. यावरुन दलाल यांनी दिलेली हिंट खरी मानली जात आहेच त्याचबरोबर ‘हर्षद मेहता स्कॅम’ प्रमाणे हा घोटाळा झालाय आहे का? जर हा घोटाळा झाला तर मार्केटमधील हा ‘बिग बूल’ कोण? असा सवाल उपस्थित होतो.

    दरम्यान, NSDL ने (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने) अदानी ग्रृपशी निगडीत असलेल्या तीन परदेशी गुंतवणुकदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स ढासळले आहेत. या तीनही कंपन्यांची अदानी समुहामध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचं समजतंय.

    मिळालेल्या माहितीनुसार या तीनही कंपन्याचे अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशनमध्ये 08. 03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के, अदानी इंटरप्राईजेसमध्ये 6.82 टक्के तर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये 3.58 टक्के गुंतवणूक आहे.