सात फेरे घेण्याआधी ‘तिने’ केला हवेत गोळीबार, नवरीच्या या अनोख्या अंदाजाचा Video तुफान व्हायरल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसओ जेठवारा संजय पांडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, हे खरंच झालं असल्यास याप्रकरणी लायसन्स जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

    लखनऊ : नवरी म्हणजे लाजणारी पण आता ही नवरी काळाच्या ओघात बदलत आहे. लाजणारी नवरी ते दरारा निर्माण करणारी नवरी असे काहीसे चित्र आता पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार आता उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये घडला आहे. या लग्नातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नवरीबाईनं आधी हवेत गोळीबार केला आणि यानंतर नवरदेवाला वरमाळा घातली. नवरीबाईनं केलेल्या या फायरिंगचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला.

    प्रतापगडमध्ये जेठवारा ठाण्यापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका गावात लग्नसमारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्नमंडपात सगळी मंडळी जमली होती. सुरुवातीला नवरदेवाची वरात आली.त्यांनतर रात्री सुमारे अकरा वाजता नवरीबाई लग्नासाठी स्टेजवर चढत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं तिच्या हातात रिवॉल्वर दिली. यानंतर नवरीबाईनं स्टेजवर चढताच पहिल्यांदा हवेत गोळीबार केला आणि यानंतर तिनं नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली. नवरीबाईनं हवेत गोळीबार करताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.

    तिचा हा गोळेबरचा व्हीडीओ दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बुधवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नवरीबाईनं केलेला हवेतील गोळीबार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसओ जेठवारा संजय पांडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, हे खरंच झालं असल्यास याप्रकरणी लायसन्स जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.