Campaign : स्वप्न पाहाणाऱ्या भारतीयांची स्वप्ने साजरी करण्यासाठी व त्यांना प्रेरित करण्यासाठी शेल इंडियाकडून ‘ग्रेट थिंग्ज हॅपन व्हेन वी मूव्ह’ या नव्या कँपेनचा शुभारंभ

अनेक भारतीयांसाठी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत सामाजिक व आर्थिक परिणाम घडवून आणण्यात त्यांचे वाहन हे महत्त्वाची भूमिका अदा करते. ‘ग्रेट थिंग्ज हॅपन व्हेन वी मूव्ह’ ही कँपेन केवळ ‘पुढे चालत राहाणे’ ही एक साधी-सोपी गोष्ट करून, अद्वितीय धाडस आणि प्रेरणेच्या जोरावर आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाऱ्या लोकांविषयी आहे. प्रगती करण्यात आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हे कँपेन सुरू करण्यात आले आहे.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी वास्तव आयुष्यातील प्रेरणादायी गोष्टींची मांडणी

दिल्ली : भारतातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करणाऱ्यांपैकी एक असलेल्या शेल इंडियाने देशाच्या बांधणीला योगदान देत या देशाचा एक विश्वासार्ह भागिदार या नात्याने ‘ग्रेट थिंग्ज हॅपन व्हेन वी मूव्ह’ या कँपेनचा शुभारंभ केला आहे. भारतीयांची विजीगिषू वृत्ती, त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा यांना या कँपेनच्या माध्यमातून साजरे करण्याचे या कँपेनचे उद्दिष्ट आहे. शेलने सतत पुढे जाण्याशी संबंधित तीन प्रेरणादायी कथा मांडणाऱ्या तीन नव्या ब्रँड फिल्म्सची निर्मिती केली असून याद्वारे या देशात होणाऱ्या बदलांना चालना देण्यासाठीची भागिदारी आणि बांधिलकी अधोरेखित करण्यात आली आहे.

अनेक भारतीयांसाठी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत सामाजिक व आर्थिक परिणाम घडवून आणण्यात त्यांचे वाहन हे महत्त्वाची भूमिका अदा करते. ‘ग्रेट थिंग्ज हॅपन व्हेन वी मूव्ह’ ही कँपेन केवळ ‘पुढे चालत राहाणे’ ही एक साधी-सोपी गोष्ट करून, अद्वितीय धाडस आणि प्रेरणेच्या जोरावर आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाऱ्या लोकांविषयी आहे. प्रगती करण्यात आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हे कँपेन सुरू करण्यात आले आहे.

ग्राहकांचा एक विशिष्ट संच त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करत असून महिला या आमच्या कँपेनच्या संकल्पनेचा आत्मा अचूक पकडत असल्याचे शेल इंडियाच्या संशोधनात आढळून आले आहे. या नव्या कँपेनच्या माध्यमातून तीन प्रेरणादायी महिलांच्या रोमहर्षक गोष्टी मांडून भारतीय महिलांना सतत पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे : भारतातील पहिल्या महिला ट्रक चालक योगिता रघुवंशी, बॉलिवुडमधील आघाडीची स्टंटवुमन गीता टंडन आणि वुमन ऑन वाँडरलस्टच्या संस्थापक सुमित्रा सेनापती. सतत चालत राहाणे, कार्यरत राहाणे हे प्रगतीचे मुख्य साधन असून महिलांच्या बाबतीत तर हे विशेषकरून सत्य आहे, हा या फिल्म्सचा गाभा आहे.

अधिक प्रमाणात आणि स्वच्छ ऊर्जा सोल्युशन्स उपलब्ध करून देऊन प्रगतीला चालना देणे हे शेल इंडियाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासंदर्भात शेल कंपन्यांचे भारतातील चेअरमन नितीन प्रसाद म्हणाले, “भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी एक आहे आणि देशाच्या प्रगतीत चलनवलनाची भूमिका किती महत्त्वाची असते, हे आम्ही जाणतो. शेल इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी, तसेच, चलनवलन, विशेषतः महिलांसाठी शक्य व्हावे, यादृष्टीने दिशादर्शक अशी उत्पादने व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रत्नशील आहेत. कारण महिलांसाठी हा प्रवास अजिबातच सोपा नसतो. महिलांना कामाच्या सर्व विभागांमध्ये, सर्व पातळ्यांवर आणि सर्व ठिकाणी समान सहभाग मिळावा, याची हमी असणे हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. आमचे काही पेट्रोल पंप फक्त महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालवले जातात. आमच्या बांधकामाखाली असलेल्या काही ठिकाणी छत टाकण्याचे काम केवळ महिला कर्मचारी करत आहेत. शेलच्या व्यवसायातील सुमारे एक तृतियांश व्यावसायिक/कर्मचारी महिला आहेत आणि शाळा व महाविद्यालयांमध्ये आमच्या तरुण हुशार विद्यार्थ्यांना स्टेम शिक्षणात रस निर्माण व्हावा, यासाठी आम्ही प्रोत्साहन देत असतो. आजवर आम्ही जो काही प्रवास केला, त्याचा आम्हाला अभिमान असून अजूनही खूप काही करण्यासारखे आहे. या मार्गावर सतत पुढे जात राहून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

या फिल्म्स तीन विस्मयकारक महिलांच्या गोष्टींवर आधारित असून प्रत्येक फिल्मच्या केंद्रस्थानी मोबिलिटी आहे. पहिल्या फिल्ममध्ये योगिता रघुवंशी या भारतातील पहिल्या महिला ट्रकचालकाची गोष्ट मांडण्यात आली आहे, जिला तिच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर एकल माता या नात्याने कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागल्याने आपले कायदेविषयक शिक्षण पूर्ण करता आले नाही. दुसऱ्या फिल्ममध्ये अप्रिय विवाहबंधनातून मोकळी होऊन आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी विविध गोष्टींचे प्रयत्न करणाऱ्या गीता टंडन यांची गोष्ट आहे. यथावकाश त्या बॉलिवुडच्या आघाडीच्या स्टंटवुमन बनल्या. तिसऱ्या फिल्ममध्ये वुमन ऑन वाँडरलस्टच्या संस्थापक पर्यटनतज्ज्ञ सुमित्रा सेनापती महिलांना जगभरातील ५० ठिकाणे फिरण्यासाठी कशाप्रकारे प्रोत्साहित करतात, हे दाखवण्यात आले आहे.